बांधकाम कामगार धडकले उपविभागीय अधिकारी कार्यालयावर

रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात ३०० ते ४०० बांधकामगारांची एचडीओकडे मागणी
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
‘बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरण योजने’ साठी लागणाऱ्या कामगार प्रमाणपत्र यावरील ग्रामसचिव यांची लागत असणारी स्वाक्षरी या संदर्भात उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायतीचे ग्रामसचिव हे निर्देशाप्रमाणे कागदांची पूर्तता करून सुद्धा अतिरिक्त कागद पत्राची मागणी करून बांधकाम कामगार प्रमाणपत्रावर स्वाक्षरी देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा लाभार्थ्यांचा आरोप असून, त्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. सदर योजनेला कालमर्यादा असून

होणाऱ्या दिरंगाईमुळे लाभार्थी हे कायमचे योजनेपासून वंचित राहतील. तरी आपण सदर विषयीची चौकशी करून वंचित बांधकाम कामगारांना तात्काळ स्वाक्षरी देण्यासंदर्भात लेखी सूचना निर्गमित कराव्या अशी आज रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन भाऊ दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, शहर उपाध्यक्ष अमोल जाधव पाटील, शहर संघटक नंदू इटकरे, शहर सचिव साई पाटील नरवाडे, बबलू जाधव पाटील, अरविंद धोंगडे, प्रकाश वाहुळे, पंचाबाई पाटील, सुकेशना काळबांडे, रेखाबाई दवणे, शिला कांबळे, प्रियंका नरवाडे, कविता

काळबांडे, वैशाली काळबांडे, सखूबाई काळबांडे, मायाबाई कांबळे, पुसाबाई धुळे,पर्यागबाई काळबांडे, निकिता काळबांडे, आशा काळबांडे, कविता काळबांडे, सविता काळबांडे, सुरेखाबाई कांबळे, कौशल्याबाई कांबळे, ज्योती भालेराव, मधुबाला काळबांडे व मोठ्या संख्येने सावळेश्वर येथील लाभार्थी उपस्थित होते.