Uncategorized
हदगांव शहरात दररोज विजेचा खोळंबा.

तालूका प्रतिनिधी बालाजी पाटील
हदगांव (नांदेड)
सध्या पावसाळा सुरू झाला असुन सारखा रिमझिम पाऊस ४ ते ५ दिवसांपासून सुरू आहे.परंतु
विजवितरण कंपनी चा शहरात लपंडाव सुरू आहे. या आठ ते दहा दिवसांपासून विज सकाळी, संध्याकाळी कधी पण विजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरीक, दुकान व्यापारी त्रस्त झाले असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र विज वितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सतत चा विजेचा लपंडाव बंद करुन नियमित विज पुरवठा चालू राहावा असे नागरीक व व्यापारी,व्यावसायिक यांची मागणी असल्याचे दिसते.