शहर

महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा; काँग्रेसच्या रेखा चव्हाण यांचे हिमायतनगरमध्ये आवाहन


हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायत नगर तालुक्यासह परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना सुशिक्षित व पदवीधर मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश महासचिव रेखा चव्हाण यांनी केले आहे,.
नांदेड येथील प्रचार सभेदरम्यान बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मराठवाड्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असताना, सरकारने हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देण्याऐवजी केवळ ५ हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे, असा आरोप त्यांनी केला,,.
याशिवाय, पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी अभ्यासू व डॉक्टर उमेदवाराची गरज असल्याचे सांगत त्यांनी ईव्हीएम बंद करणे, दूषित एसआर प्रक्रिया रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली,. देश आणि संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक पदवीधराने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले,.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button