शहर

स्वच्छता दूतपदी नियुक्ती झाल्याबद्दल परवेज बेग मिर्झा यांचा विविध संघटनांतर्फे सत्कार





आर्णी नगरपरिषदेकडून स्वच्छता दूतपदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते परवेज बेग मिर्झा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम ग्रुप, आय.एस. ग्रुप, स्थानिक व्यापारी बांधव तसेच लक्ष्मीनारायण नगर व दत्तनगर येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. परवेज बेग मिर्झा हे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि निस्वार्थी सामाजिक कार्यामुळे परिचित आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या वेळी दिवस-रात्र मदतीसाठी धावून जाणे, ही त्यांच्या कार्याची खासियत आहे. सर्वधर्मसमभाव जपत समाजातील प्रत्येक घटकाला सहकार्य करणे, ही त्यांची ओळख आहे. आर्णी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनजागृती करणे, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि

स्वच्छता मोहिमेत जनसहभाग वाढविणे, या उद्देशाने स्वच्छता दूत म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध संघटना, व्यापारी बांधव आणि नागरिकांनी त्यांचा सत्कार करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“समाजसेवा हेच माझे ध्येय आणि माणुसकी हाच माझा धर्म! स्वच्छ, सुंदर आणि निरोगी आर्णी घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या कार्याचा सन्मान करणाऱ्या सर्व संघटना, व्यापारी बांधव आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार. आपले प्रेम आणि विश्वास हीच माझ्या सामाजिक कार्याची खरी ताकद आहे.,परवेज बेग मिर्झा, स्वच्छता दूत, नगरपरिषद आर्णी यांची प्रतिक्रिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button