Uncategorized

नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: ईसापूर धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी ४ पाण्याचे आवर्तन जाहीर


(प्रतिनिधी शेख खय्यूम)
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना संजीवनी देण्यासाठी ईसापूर धरणातून एकूण ४ पाणी पाळ्या (आवर्तन) सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड पाटबंधारे मंडळाने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले असून प्रत्येक आवर्तन २४ दिवसांचे असणार आहे.
या जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, रब्बी हंगामातील पिकांसाठी पहिले आवर्तन १ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर आणि दुसरे आवर्तन २० डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान सोडले जाईल. तर उन्हाळी हंगामातील पिकांसाठी तिसरे आवर्तन १ मार्च ते २४ मार्च आणि चौथे आवर्तन २० एप्रिल ते १४ मे या कालावधीत कालव्यातून सोडले जाणार आहे. या नियोजनबद्ध पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा मोठा आधार मिळणार असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button