शहर

दोन वर्षे तहसीलच्या फेऱ्या मारूनही जन्म प्रमाणपत्राच्या फाईली प्रलंबित; प्रशासनाच्या कारभारावर हिमायतनगरच्या गोरगरीब जनतेचा संताप!


(तालुका. प्रतिनिधी शेख खय्यूम)

जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज देऊन दोन वर्षे उलटले, तरी हिमायतनगर तहसील कार्यालयात फाईली धूळखात पडून आहेत. भाड्याच्या गाड्या करून आणि स्वतःचे रोजंदारीचे काम सोडून गोरगरीब नागरिक दोन वर्षांपासून तहसीलचे उंबरठे झिजवत आहेत. आता दोन वर्षांनंतर या फाईली न्यायालयात पाठवणार असल्याचे सांगितले जात असल्याने, जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शासकीय नियमांनुसार नागरिकांना वेळेत दाखले मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जर प्रकरण न्यायालयातच पाठवायचे होते, तर नागरिकांना दोन वर्षे त्रासात का ठेवले? या विलंबाला जबाबदार कोण आणि गोरगरिबांच्या झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाची भरपाई कोण देणार, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी तहसीलदारांनी तात्काळ भूमिका स्पष्ट करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button