सामाजिक

प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा येथील अधिकारी कर्मचारी सुविधांपासून कोसो दूर

शेख शेख मुजाहिद सह-संस्थापक तो.7798306192

उमरखेड
दिनांक १८/१०/२०२५
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे प्रत्यक्षात उतरवित रुग्ण सेवेत सदैव तत्पर राहून कर्तव्य बजावणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याचे १७/१०/२०२५ रोजी संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ने दिलेल्या भेटीत दिसून आले.

तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास ५९ ते ६० किमी अंतरावर बंदी भागात कोर्टा या गावी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रास संयुक्त पत्रकार संघाचे वतीने फेरफटका मारत असताना भेट देण्याचा योग आला असता या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांच्या भेटीदरम्यान केंद्रातील अ सुविधांची दयनीय अवस्था बघावयास मिळाली. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये संपूर्ण आरोग्य केंद्र जलमय अवस्थेत होते त्या काळात सतत ७ दिवस विद्युत पुरवठा खंडित होता तर निवासस्थानात संपूर्ण पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्यामुळे त्या काळात प्रचंड आबाळ झालेली ऐकावयास मिळाली. भेटी दरम्यान रात्रीची वेळ झाली असल्यामुळे या ठिकाणी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो एकदा विद्युत पुरवठा बंद झाला की लवकर सुरू होत नाही ही बाब प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे या ठिकाणी कायम अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहण्याची गरज भासत होती. येथील निवासस्थानांची अवस्था बघता एकीकडे अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे मुख्यालयी राहण्याचे शासन आदेश असताना अनेक जण मुख्यालय राहत नसल्याची ओरड ऐकावयास मिळते तर दुसरीकडे कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी परिचारिका यांच्या निवासस्थानाची अत्यंत दयनीय अवस्था असून सुद्धा ते आपले आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य मोठ्या हिमतीने आणि त्यातही उत्साही पणे करतात याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. भेट घेऊन परत येत असताना सगळेच नोकरदार वर्ग सुख सुविधेत आरामात राहणे पसंत करत असताना येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना कुठलीही मूलभूत सुविधा परिपूर्ण नसताना सुद्धा ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडत असल्याचे दिसून आल्याने त्यांचे विषयी अंतकरणातून कृतज्ञता व्यक्त करणे साहजिकच होते.

चौकट
प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा येथे अखंडित विद्युत पुरवठा पुरविण्यासाठी त्याचप्रमाणे या आरोग्य केंद्रामध्ये राहत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थानी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने कार्यवाही करून सुख सुविधांचा मूलभूत गरजांचा अभाव असून सुद्धा दर्जेदार आरोग्य सेवा बजावत असणाऱ्या अशा कर्तव्यदक्षवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह वाढवावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button