वादग्रस्त पेट्रोल पंपावर प्रशासन मेहरबान?” – संतप्त सर्वपक्षीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा !

वादग्रस्त पेट्रोलपंपाची लिज वाढवून दिल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची जनसुनावणी घेऊन पेट्रोल पंप हटविण्याची कार्यवाही करा
सहसंपादक शेख मुजाहिद
उमरखेड, ता. २४ : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकालगत असलेल्या व मागील अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पेट्रोल पंपाला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी असंख्य आक्षेप झुगारून लिज नुतनीकरण करून 5 वर्षा करीता पुन्हा वाढवून दिल्याने शहरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची जनसुनावणी घेऊन जागेचे पुनर्निरिक्षण करावे व सदर पेट्रोल पंप हटवावा या मागणीसाठी विविध राजकिय पक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उमरखेड उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकालगत असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपास जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जनआक्रोष झुगारून असंख्य आक्षेपांना केराची टोपली दाखवून प्रकरण क्र. एलएनडी 02 / 2022-23 उमरखेड येथील वार्ड क्र । मालमत्ता क्र. 278, क्षेत्रफळ 303 चौ फुट या प्रकरणात जागेची लीज पाच वर्षाकरीता दिर्घकालीन लीज वाढवून दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सौंदर्याकरणास अडचण ठरणाऱ्या या पेट्रोल पंपास मुदतवाढ दिल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असल्याने या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 5 वर्षाकरीता लीज मुदतवाढ आदेशाचे पुनर्निरिक्षण करावे व सदर वादग्रस्त पेट्रोलपंप इतरत्र स्थलांतरीत करावा अशा आशयाचे निवेदन शिवसेना (शिंदे) जिल्हा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, यवतमाळ जिल्हा काँग्रेस सरचिटनीस गोपाल अग्रवाल, जनशक्ती पॅनलचे अॅड. संतोष जैन, शिवसेना (शिंदे) अॅड. संजीव जाधव, अनिल नरवाडे, भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठलराव वानखेडे, रमेश चव्हाण, बाळासाहेब नाईक, खविसचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, शिवसेना (शिंदे) तालुका अध्यक्ष प्रविण मिराशे पाटील, माजी पं. स. सभापती प्रज्ञानंद खडसे, नगरसेवक साजीद जागीरदार, गणेश खंदारे, रसुल पटेल, गजानन रासकर, कांग्रेसचे कल्याणराव राणे, अॅड. शिवाजी वानखेडे, विनायक कदम, बसवेश्वर क्षीरसागर, भाजपाचे गजानन पाटील वाघमारे, कपील चव्हाण, सपना चौधरी, शेख इरफान शेख इसा, एस पी दळवी संतोष जाधव, तानाजी चंद्रवंशी, बालाजी वानखेडे, यांच्यासह विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार सुभाष पाईकराव यांचे मार्फत निवेदन सुपूर्द केले.
एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
66 या प्रकरणी 27 एप्रील रोजी शिवप्रेमींचा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी जनभावनांना ठेच पोहचून एका व्यक्तीच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अडथळा ठरणाऱ्या पेट्रोल पंपाची लीज तब्बल 5 वर्षासाठी वाढवून दिल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दि. 27 एप्रील रोजी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील शिवप्रेमी विविध संघटना, व्यापारी व नागरिकांनी या निषेध मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते चितांगराव कदम यांनी यावेळी संबोधित करतांना केले आहे.



