शहर

महागावात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बेमुदत बंदचा इशारा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव, दि. 24 एप्रिल 2026 (शुक्रवार): राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींवर कृषी विभागाकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ महागाव तालुका कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत “बी-बियाणे व कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद” आंदोलन पुकारण्यात आले आहे.
तालुक्यातील विविध कृषी केंद्र चालकांना भेडसावत असलेल्या अनेक गंभीर समस्या अद्याप निकाली न लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. प्रमुख अडचणींमध्ये कंपन्यांकडून रासायनिक खतांचा अपुरा पुरवठा, बेकायदेशीर लिंकिंग पद्धती, शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित बियाण्यांची विक्री, तसेच एसटीटी कंपनीशी संबंधित बियाण्यांचे प्रलंबित प्रश्न यांचा समावेश आहे.
या सर्व समस्यांमुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबतचे निवेदन आज दि. 24 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती महागाव येथील कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button