शहर

महागाव शहरात बाजारदिनी वाहतूक कोंडी; सुरा हल्ल्याने नागरिकांत भीती


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
–महागाव शहरात शुक्रवारी भरत असलेल्या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी संपूर्ण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असूनही ट्राफिक जमादार व बीट जमादार यांची उपस्थिती नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज दुपारी सुमारे चारच्या सुमारास सुरा व लोखंडे रोड परिसरात सोडा विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्लेखोराच्या हातात शस्त्र असल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतरही बीट जमादार किंवा पोलीस कर्मचारी घटनास्थळी त्वरित पोहोचले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच, बाजार परिसरात खुलेआम मटका सुरू असल्याचेही निदर्शनास आले असून यामुळे मोठी गर्दी होत आहे. मात्र, संबंधितांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बाजारदिनी पोलीस बंदोबस्त वाढवून वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने त्वरित दखल घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button