सामाजिक
महागाव तालुक्यात एकाच गावात दोन आत्महत्या ग्रस्त यांना माणिकराव ठाकरे यांच्या आदेशाने काँग्रेस कडूनआर्थिक मदत

दिनांक 16 10 25 रोजी महागाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नेते श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज दहिसावळी येथे आत्महत्याग्रस्त दोन्ही कुटुंबीयांना छोटीशी आर्थिक मदत देण्यात आली त्यावेळी महागाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय वनमालाताई राठोड तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख ,स्वप्नील जिनायक ,विठ्ठल पवार ,संभाजी दादा नरवाडे ,सुनील भवानकर व यवतमाळ जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे तथा जावेद चव्हाण व तालुक्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.



