शहर

पुन्हा महागाव तालुक्यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्याप्रशासनाबाबत नाराजी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात पुन्हा मौजे भांब ता . महागांव येथील जयवंतराव रामु राठोड यांनी दि .१५/१०/२५ रोजी आर्थिक परिस्थितीला कंटाळून विष प्राशन केले तातडीने त्यांना यवतमाळ येथे रुग्णालयात दाखल करून उपचार चालू केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . महागाव तालुक्यात वारंवार शेतकरी आत्महत्या का करत आहे. याबाबत चिंतेचा विषय बनले आहे. शासनाने तात्काळ महागाव तालुक्यात दखल घ्यावी, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्या अन्यथा अशा घटना बार-बार घडतील त्यांच्या पश्चात पत्नी विमलबाई मुलगा दत्ता जयवंता , राम जयवंता दोन मुले आहेत मृतकाच्या नावाने १ हेक्टर ५१ आर असून सेंट्रल बँकेचे पिक कर्ज आहे . अतिवृष्टीमुळे शेतातील पीकही हातचे गेल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचे समजते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button