शहर

महागाव पं.स. बोगस स्वाक्षऱ्या केलेल्या एम. बी . पळून नेणारे रेकॉर्ड अखेर जप्त!(दैनिक महासागर वृत्तपत्राची दखल व उंबरखेड वार्ता ची दखल)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत येथील उदगार सेवक ठेकेदार सरपंच यांनी गावातील रस्त्याचे काम न करता बोगस डुप्लिकेट सह्या करून रेकॉर्ड 7ऑक्टोबर रोजी सादर करण्यात आले होते. त्या बोगस कामाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते अमजद खान पठाण यांना माहित पडले त्यांनी लेखी तक्रार दिल्यावर हे प्रकरण ग्रामसेवक पाटील सादर केल्यामुळे हे प्रकरण आपल्या आगलट येईल म्हणून 9 तारखेला दाखल केलेले प्रकरण भूल ताप देऊन पळून नेले. याबाबतची माहिती दैनिक महासागर मध्ये दहा तारखेला प्रसिद्ध झाल्यावर अधिकाऱ्यांमध्ये पळापळ झाली गटविकास अधिकारी यांनी उत्तपत्राची दखल घेऊन त्या प्रकरणाची चौकशी समिती नेमली11 तारखेला पुन्हा दैनिक महासागर मध्ये बातमी प्रकाशित झाल्यामुळे दी-15-10-25 रोजी सचिवाला पत्र काढून 16 तारखेला विस्तार अधिकारी नागरगोजे व कर्मचारी यांनी वाकोडे येथे जाऊन संपूर्ण पळून नेलेले रेकॉर्ड पाटील ग्रामसेवक (संघटनेचे अध्यक्ष ) यांच्याकडून जप्त केले. त्या रेकॉर्डमध्ये आठ ते नऊ बोगस अधिकाऱ्याच्या डुप्लिकेट सह्या करून नऊ एमबी तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचने प्रथम दर्शनीय चौकशीमध्ये आढळून आल्यामुळे मागील सर्व ग्रामसेवक बांधकाम विभागाचे जेई व मागील गटविकास अधिकारी त्यांना नोटीस काढून त्यांच्या सह्या ची शाहनिशा व बयान घेणे महत्त्वाचे असल्यामुळे तातडीने उद्याला पत्र काढल्या जाईल असे चौकशी विस्तार अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे कोणावर फौजदारी गुन्हे दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सर्व प्रकरण दैनिक महासागर वृत्तपत्राच्या प्रकाशित झालेल्या बातमीवरून उघड झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button