शहर

दिवाळीच्या तोंडावर महागाव मध्ये “बनावट पत्रकारांचा” सुळसुळाटवसुलीसाठी शासकीय कार्यालयात घुसखोरी; दिवाळीच्या नावाखाली अधिकारी-व्यापाऱ्यांची लूट; पैसे न दिल्यास बदनामीची धमकी

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात दिवाळीचा सन तोंडावर येतात महागाव तालुक्यात बनावट पत्रकारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. हातात मोबाईल आणि गळ्यात बनावट ओळखपत्र अडकून हे तोतया पत्रकार शासकीय कार्यालय आणि व्यापाऱ्याकडून दिवाळीच्या नावाखाली जबरदस्ती वसुली करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या बाहण्याने हे भामटे अधिकारी आणि व्यापाऱ्याकडे जाहिरात भेटवस्तू किंवा थेट रोकड मागतात. पैसे देण्यास नकार दिल्यास सोशल मीडियावर बदनामीकारक बातम्या पसरवण्याची उघड आमची ही दिली जात असल्याने अनेक जण भीतीने तोंड उघडत नाहीत.या वसुली रॉकेटमुळे प्रामाणिक अधिकारी आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा काही भ्रष्ट अधिकारी फायदा घेऊन स्वस्त धान्य परवानाधारकांकडून मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयात वसुली केली आहे. पंचायत समिती बांधकाम मध्ये सुद्धा हाच प्रकार मोठ्या प्रमाणात ग्रामसेवक कडून वसुली करण्यात आली आहे.म्हणजे काहीजण परिस्थितीत उत्त संस्थाचे नाव वापरून हा गैरप्रकार करत असल्याने खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकारांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. पत्रकारिते सारख्या पवित्र व्यवसायाला लागलेले हे ग्रहण दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button