शहर

हिमायतनगर येथे काँग्रेस पक्षाची स्थापना करणारे सय्यद अब्दुल्ला यांचे मुलाला नगर सेवक ची उमेदवारी काँग्रेस देणार का?

हिमायतनगर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सय्यद अब्दुल्ला सय्यद हसन यांनी सन 1979 मध्ये शेका पक्षाचा बाली किल्ला असलेल्या हिमायतनगर मध्ये काँग्रेस पक्ष आणून नवीन सुरुवात केली होती व काँग्रेस पक्षाचा झेंडा हिमायतनगरच्या ग्रामपंचायत वर फडकविले होते तेव्हा अब्दुल नसीर हाजी महम्मद खाजा, सरपंच झाले होते.
हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये उर्दू 10 वी ची मान्यता सन 1980 मध्ये कै, माजी मुख्यमंत्री तथा देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हान यांच्या मार्फत करून आणले,
व तसेच 1999 मध्ये जेव्हा आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेस पक्षामधून बाहेर पडले होते तेव्हा काँग्रेस बुडाली होती,
तेव्हा सय्यद अब्दुल्ला यांनी सदाशिव मार्केट हिमायतनगर येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांची सभा बोलावली होती.
आणि काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतले त्यांचे सोबत जेवढे हिमायतनगर मध्ये काँग्रेसचे नेते मंडळी कार्यकर्ते होते ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये न जाण्याचा निर्णय घेतले व काँग्रेस पक्षामध्येच राहण्याचा निर्णय सय्यद अब्दुल्ला यांचे सोबत घेतले होते.
तेव्हापासून या हिमायतनगर शहर व परिसरामध्ये काँग्रेस मय वातावरण निर्माण झाले.
माजी मुख्यमंत्री तथा देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण सोबत राहून सय्यद अब्दुल्ला भाई यांनी अनेक कार्य केले हिमायतनगर येथे कोर्ट नव्हते कोर्ट हदगाव येथे अरेंज होती न्यायालयीन कामासाठी हदगाव येथे जावे लागत होते ही बाब लक्षात घेऊन सय्यद अब्दुल्ला यांनी औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती बी. एन देशमुख साहेब यांची भेट देऊन हिमायतनगर येथे न्यायालयाच्या दिवाणी फौजदारी न्यायालयास मंजुरी घ्यावी अशी मागणीचे प्रस्ताव दिले व त्यात चा सविस्तर अहवाल मंत्रालयाचे कक्षात पाठविण्यात आला यासाठी सातत्याने सय्यद अब्दुल्ला भाई यांनी पाठपुरावा करून शासन दरबारी केले,
त्यानुसार हिमायतनगर येथे सन 1997 मध्ये दिवाणी फौजदारी न्यायालय मंजूर झाले हिमायतनगर येथे बँक नव्हती याबाबत ही सय्यद अब्दुल्ला सय्यद हसन यांनी कै. माजी खासदार उत्तमरावजी राठोड यांच्याकडे सातत्याने मागणी पाठपुरावा करूनसय्यद अब्दुल्ला यांनी भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर मंजूर करून आणले.
सय्यद अब्दुल्ला यांचा हिमायतनगर विकसा मध्ये सिंहाचा वाटा है
व तसेच महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्या काळातील माजी मुख्यमंत्री कै. शंकररावजी चव्हाण व त्यांचे सोबत सुधाकर रावजी नाईक,
यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद अब्दुल्ला हिमायतनगर चे विशेष कार्यकारी अधिकारी झाले होते तेव्हा त्यांनी निस्वार्थ सेवा केली .
काँग्रेस पक्षाची सुरुवात केल्याच्या नंतर अनेक खासदार आमदार झाले त्यांना हिमायतनगर सर्कल मधून सर्वात जास्त लीड मिळत गेली कारण येथे सय्यद अब्दुल्ला भाई यांनी सर्व समाजाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढत होते त्यामुळे लोक त्यांचा सल्ला घेऊन पक्षाचे काम करत होते त्यामुळे हिमायतनगर हे काँग्रेस मय बनले,
त्यांनी केलेल्या कार्याचे जितके कौतुक केले तितके कमी आहे त्यांच्याच आदर्श घेऊन सय्यद अब्दुल अजीम सय्यद अब्दुल्ला उर्फ (अजीम हिंदुस्तानी) हे चालत आले व त्यांचा परमाने ते वागत आहे व त्यांच्याप्रमाणेच लोकांच्या हक्कासाठी लढण्याच्या ते प्रयत्न करीत आहे.
अजीम हिंदुस्तानी म्हणतात माझ्या वडिलांनी हिमायतनगर मध्ये काँग्रेस पक्ष आणले पण काँग्रेस पक्षाने कधीही त्यांना साथ दिली नाही वेळोवेळी माझे वडील अब्दुल्ला यांना डावलून काँग्रेस पक्षाने इतर लोकांना आजपर्यंत तिकीट दिले काँग्रेस पक्षाने कधीही अब्दुल्ला भाई यांना निवडणुकीच्या वेळी रिंगणात घेण्याचा प्रयत्न केले नाही,
सय्यद अब्दुल्ला सय्यद हसन माझे वडील यांनी दोन वेळेस काँग्रेस पक्षाला तिकीट मागितले एक जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी व दुसरा पंचायत समितीच्या निवडणुकी वेळी पण काँग्रेस पक्षाने कोणतेही पद किंवा तिकीट त्यांना दिले नाही.
अनेक वेळा माझे वडील सय्यद अब्दुल्ला यांना सोबतच्या लोकांनी दगा दिले पण.
याला बाजूला ठेवून माझे माझे वडील सय्यद अब्दुल्ला यांनी पक्षाचे काम केले पक्षासोबत राहिले शेवटपर्यंत पक्षासोबत राहिले.
माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर हे दोन वेळेस आमदार झाले चार वेळेस उभे राहिले तेव्हा माझे वडील हे माधवराव पाटील यांचे सोबत ही एक निष्ठेने इमानदारीने राहिले होते.

व त्या नंतर,सय्यद अब्दुल अजिम मी सुद्धा दोन वेळेस काँग्रेस पक्षाला तिकीट मागितले पहिल्या वेळेस माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सांगितले होते की पुढच्या वेळी तुझा एक नंबर वर नाव ठेवतो त्यानंतर दुसऱ्या वेळी ही मी मागणी करत आहे तरी मला आशा आहे की माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर हे तिकीट देऊन मला माझ्या वडीलावर माझ्या कुटुंबावर काँग्रेस पक्षाने वेळो वेळी अन्याय केले पण माधवराव जी पाटील न्याय देईल अशी आशा आहे,
आणि काँग्रेस पक्षाने जर या वेळेला नगरपंचायत नगरसेवकाची मला उमेदवारी दिली नाही तर निश्चितच पुन्हा माझ्यावर अन्याय होईल,
असे सय्यद अब्दुल्ला अजिम उर्फ (अजिम हिंदुस्तानी) यांनी आम्हाला बोलतांनी सांगितले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button