विद्युत तारा एकमेकांना चिटकुन दररोज होत असलेल्या स्पार्कींग मुळे जिवित व वित्तहाणी होण्याची शक्यता, याकडे विज वितरण कंपनीने वेळीच लक्ष देण्याची गरज.

तालुका प्रतिनिधी बालाजी पाटील
बुध्दभुमि वसाहत,
(समाजकल्याण) हदगांव भागात जवळपास ९० ते १०० घराची वस्ती आहे.या भागात दोन खांबांवरील विद्युत तारा एकमेकांना चिटकुन होत असलेल्या स्पार्कींग मुळे मोठी हाणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याकडे विद्युत वितरण कंपनीने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असुन वातावरणतील बदलामुळे वादळ हवे मुळे जर विद्युत तारांच्या मध्ये भागी असलेले मोठे झाड तारांवर जर पडले तर यामुळे आजुबाजुला असलेल्या नागरिकां च्या जिवितवास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजुबाजुचे रहिवासी जिवमुठीत धरून राहत आहेत.तारा एकमेकांना चिकटून घरातील उपकरणे सुध्दा जळुन जातील. तरी विज वितरण कंपनीने वेळीच उपाययोजना करून हवेमुळे एकमेकांना चिकटत असलेले विद्युत तार व्यवस्थित करून भविष्यात होणारी हाणी टाळावी.असे आजुबाजुचे नागरीकांनी आमच्या प्रतिनिधीकडे सांगुन व्यथा मांडली आहे.