सामाजिक

सरोज देशमुख यांना महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार जाहीर

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

नवी मुंबई येथील कोर्ट यार्ड मेरिट या ठिकाणी दि २८ जानेवारी रोजी पत्रकार संघाचा रौप्य महोत्सव साजरा होत असून या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सिने सिने अभिनेते सयाजी शिंदे, दूरदर्शन केंद्राचे माजी संचालक मुकेश शर्मा, दैनिक देशोन्नती चे संपादक प्रकाश पोहरे, विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार तथा गर्जा महाराष्ट्र चैनल चे मुख्य संपादक अनिल महाजन, गायिका दिपाली देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सरोज नंदकिशोर देशमुख ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रियदर्शनी इंदिरागांधी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून ५ वि ते १० वि मराठी मीडियम ची शाळा सुरू केली, त्या रोपाचा आता वटरुक्ष झाल त्या माध्यमातून सरोजताई देशमुख यांनी आपल्या सहकऱ्यांसह २०१२ साली उमरखेड येथे देशमुख महाविद्यालयाची स्थापना केली. दारुबंदी, महिलांचे व समाजातील इतर प्रश्न सोडवणे व समाज उपयोगी असे अनेक उपक्रम घेतले. तसेच सकाळ
तनिष्का समूहाच्या माध्यमातूनही काम केले, २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या कामात सहभाग घेवुन हीरीरीने तालुक्यातील कामे केली. प्रबोधनाचा कार्यक्रम घेतले महिलांचे सक्षमीकरना सोबत अनेक समाज उपयोगी कामात सर्वांच्या सहकार्याने त्या नेहमीच
अविरत काम करत आहेत.

अन्याय होईल तेथे सर्व सहकाऱ्यांचा साह्याने वाच्या फोडण्याचा प्रयत्न करत जिजाऊ ब्रिग्रेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर समाजासाठी काम केले गरजू महिलांना रोजगार, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत सरोज ताई देशमुख या करत आहेत सध्या जिजाऊ ब्रिग्रेड च्या प्रदेश सहसचिव या पदावर असून प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून बचत गटा मार्फत महिलाना आर्थिक सामाजिक प्रबळ करण्याचे काम चालू आहे भविष्यातही समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रगती साठी जमेल ते प्रयत्न करण्याची महत्वाकांक्षा आहे. त्यांच्या या समाज उपयोगी महिला सक्षमीकरण करणे आधी कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे महाराष्ट्र रायझिंग स्टार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांना पुरस्कार जाहीर
झाल्यामुळे त्यांचे सर्वच
स्तरावरून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!