सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर यांच्यामार्फत लोकोपयोगी उपक्रम

सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड:- (दि.९ डिसेंबर) तालुक्यातील सामान्य जनतेला सरकारी योजना बाबत सरकारी बाबुगिरीचा जो त्रास होत होता तो कमी करण्यासाठी तसेच अशिक्षित लोकांना शासकीय कार्यालय गरेडा टाकून बसलेल्या दलाला पासून आर्थिक सुटका करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर महासचिव,महाराष्ट्र प्रदेश (राजीव गांधी पंचायत संघटन विभाग) यांनी दि.५ डिसेंबर रोजी हनुमान वार्ड, चिन्नावार हॉस्पिटलच्या मागे महागाव रोड उमरखेड येथे सुविधा केंद्र स्थापन केले आहे तरी गरजूवंत जनसामान्य नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
सदर सुविधा केंद्रामध्ये शासकीय कार्यालयात आपल्या सेवेसाठी शासनाच्या संपूर्ण योजनांची माहिती तसेच योजनेसंदर्भात मोफत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
उमरखेड तालुक्यातील सुशिक्षत बेरोजगार युवकांना व युवतींना रोजगार मिळावा या हेतूने स्थानिक स्थरावर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी उमरखेड येथील शासकिय योजनांची सुविधा केंद्र येथील कार्यालयात नाव नोदणी करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर यांनी केले आहे.
सध्याच्या युगात काळाची गरज ओळखून स्वतःला व आपल्या आप्त परिवाराला आरोग्य संपन्न जीवन आत्मसात करता यावे याकरिता आयुष मंत्रालय प्रमाणित योग प्रशिक्षक शिवा बिरकले यांचे सहा दिवसीय विनामूल्य योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिर दि. १२ डिसेंबर ते १७ डिसेंबर पर्यंत सोळा वर्षांवरील सर्वांसाठी सकाळी ६:३० ते ८:०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ४:०० ते ५:३० पर्यंत खास स्त्रियांसाठी शिबिर संयोग भवन उमरखेड येथे आयोजित केले. असून सर्व औदुंबर नगरीतील नागरिकांनी व्यापारी मंडळींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर महासचिव, महाराष्ट्र प्रदेश (राजीव गांधी पंचायत संघटन विभाग) यांनी केले आहे.