शैक्षणिक

गो.सी. गावंडे महाविद्यालयात वर्ल्डमिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि.१६ ऑक्टोंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, वर्ल्डमिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr A.P.J. Abdul Kalam) यांची जयंती निमित्ताने वर्ल्ड स्टूडेंट्स डे (World Student’s Day) साजरा केला जातो, त्यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व वनस्पती शास्त्र विभागाच्या अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शब्दसुमनाने श्रद्धांजली अर्पित केली व प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रामुख्याने कुमारी कांचन जाधव, किरण उपेवाडी, रुपेश खिल्लारे व इतर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रगतीवर देशाच्या विकासाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना समर्पित असा एक दिवस असायला हवा. म्हणूनच अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांना महत्त्व देणे आणि त्यांचे समाजातील महत्त्व जाणणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.

या दिवशी डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगून प्रेरित केले जाते.

कलाम यांच्या आयुष्यातील बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच या दिवसानिमित्त ते शिकण्याची संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत अनासाने यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांना सांगून प्रेरित केले.

कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या सचिव डॉ वसुंधरा शिंदे, शीतल कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!