Uncategorized

मा . आमदार नामदेवराव ससाने यांच्या कार्यकाळातील स्थानिक विकास निधी मधून माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महागाव नगरपंचायत ला मिळालेली २० लक्ष रुपये किंमतीची रुग्णवाहिका धुळखात !


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी पुन्हा आपल्याला विधानसभेचे तिकीट मिळावे म्हणून माजी अध्यक्ष नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त मोठेपणाने महागाव नगरपंचायत ला दिलेल्या रुग्णवाहिकेचा योग्य वापर व्हावा आपण केलेल्या कामाची वावा व्हावी म्हणून आपल्या फंडाचा योग्य वापर न करता फंडाचा दुरुपयोग झाल्याचे चित्र महागाव नगरपंचायत ला पाहायला मिळत आहे. रुग्णवाहिका देखरेख आणि चालक नसल्या अभावी धुळखात याला महागाव नगरपंचायत प्रशासन जबाबदार ! – भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधी मधून उमरखेड नगरपालीका , महागाव नगरपंचायत , ढाणकी नगरंचायतला आमदारांच्या स्थानिक विकास निधी मधून तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या ! विधानसभा क्षेत्रात गरजू रुग्णांना आणि गोरगरीब जनतेला या रुग्णवाहिकेचा फायदा व्हावा म्हणून मोठ्या उदात्त हेतूने नामदेवराव ससाने यांनी या तिन्ही रुग्णवाहिका सदर नगरपंचायतीला उपलब्ध करून दिल्या ! ढाणकी आणि उमरखेड येथील दोन रुग्णवाहिका कार्यरत असून रुग्ण रुग्णवाहिकेचा उपयोग घेत आहेत . परंतु महागाव नगरपंचायत ला दिलेली रुग्णवाहिका गेल्या दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात मोकळ्या जागेत उघड्यावर धुळकात पडली असून जवळपास २० लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका देखभाल आणि चालका भावी नादुरुस्त होऊन शासनाच्या पैशाचा अपव्य होऊन निकामी होण्याच्या मार्गावर आहे ! माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी महागाव नगरपंचायत रुग्णवाहिका ताब्यात घेण्यासाठीच्या कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून महागाव नगरपंचायत च्या ताब्यात गाडी दिली असताना महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष , पदाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे महागाव येथील रुग्णांसाठी देण्यात आलेली सुसज्ज रुग्णवाहिका धुळखात पडून असून सदर बाबीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे माजी आमदार यांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊन सदर ॲम्बुलन्स रुग्णसेविकरीता उपलब्ध करून देण्यासाठी आजपर्यंत कोणतीही कृती अमलात आणली नाही आमचे प्रतिनिधी पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यावर माजी आमदार यांनी माझ्या कार्यकाळात उमरखेड महागाव ढाणकी या तिन्ही नगरपंचायत नगरपालिका यांना तीन रुग्णवाहिका सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नगरपालिका नगरपंचायत च्या ताब्यात दिल्या परंतु महागाव येथील रुग्णवाहिका गेल्या दोन वर्षापासून बंद असल्याचे कळले आहे ! सदर बाबीची चौकशी करून सदर रुग्णवाहिका रुग्णांच्या कामी येण्यासाठी प्रयत्न करणार ! दूरध्वनीवरून रुग्णवाहिकेची माहिती दिल्यामुळे सदर रुग्णवाहिका बंद असल्याचे कळले आहे ! महागांव नगरपंचायत किंवा सामाजिक संस्थेला ती वापरण्यास देण्यास नगरपंचायत ला अधिकार असून त्यांनी आतापर्यंत रुग्णविका का बंद ठेवली याची चौकशी करणार ! कोणाकडे ?माजी आमदार नामदेवराव ससाने . बॉक्स : महागाव नगरपंचायत ला मा . आमदार नामदेवराव ससाने यांच्या स्थानिक विकास निधी मधून रुग्णांच्या सोयीसाठी मिळालेली रुग्णवाहिका महागाव नगरपंचायतला ताब्यात घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही ! नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून वास्तव परिस्थिती जाणून घेतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे गटनेते शैलेश कोपरकर यांनी बोलताना दिली ! परंतु महागाव नगरपंचायत ला मुख्य अधिकारी आज पर्यंत कायमस्वरूपी मिळाला नाही .त्यामुळे रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे आमदारांनी आपला निधी जनतेच्या कामासाठी उपलब्ध होईल त्याच ठिकाणी खर्च करावा ,अन्यथा निधीचा उपयोग धुळखात! रुग्णवाहिका विश्रामगृहावर विश्रांती करत आहे. हे चित्र महागाव तालुक्याला दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!