Uncategorized

केंद्रीय मंत्र्यांचे ‘खड्डेमुक्त महामार्गाचे’ दावे कागदावरच; राजकीय-प्रशासकीय आश्रयामुळे हिमायतनगर तहसीलसमोरील मुख्य रस्त्यावर कंत्राटदारांची मुजोरी अन् इंग्रजी राजवटीची आठवण!


हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम)
“देशातील सर्व महामार्ग खड्डेमुक्त करणार आणि रस्त्यांवर एकही खड्डा राहू देणार नाही,” असे ठाम दावे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी वारंवार करत असतात. मात्र, नांदेड-किनवट या जिल्हा आणि राज्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य महामार्गावरील हिमायतनगर तहसील कार्यालयासमोरून भोकरकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहता हे दावे पूर्णपणे उघडे पडले आहेत. तहसील प्रशासनाच्या नाकाखालीच उखडलेली खडी, मोठमोठे खड्डे आणि कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा यामुळे नागरिक व वाहनधारक पुरते हैराण झाले असून, रस्त्यावर वाहने रुतून बसल्याने चालकांना ती ढकलावी लागत आहेत.
बोगस कामांना नक्की कोणत्या राजकीय नेते अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय?
“एवढ्या मोठ्या मुख्य महामार्गावर अत्यंत हलक्या दर्जाचे बोगस काम करून जनतेच्या कराच्या पैशांची उघडपणे उधळपट्टी करणाऱ्या या कंत्राटदारावर नक्की कोणत्या राजकीय नेत्याचा अन् बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा आशीर्वाद आहे?” असा रोखठोक सवाल आता हिमायतनगर तालुक्यातील नागरिक उघडपणे विचारत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि राजकीय नेत्यांचे अभय असल्याशिवाय कोणताही कंत्राटदार इतक्या बेधडकपणे निकृष्ट काम करूच शकत नाही, अशी संतप्त चर्चा रंगत आहे.
कमिशनबाजीमुळे गुणवत्तेचा पुरता बोजवारा!
या मुख्य महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी आणि कंत्राटदारावर चाबूक चालवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात किंवा प्रशासनात एकतरी प्रामाणिक व स्वाभिमानी खुर्ची शिल्लक उरली आहे का, असा सवाल विचारला जात आहे. टक्केवारी, कट-कमिशन आणि लाचखोरीच्या या विळख्यात संपूर्ण शासकीय यंत्रणा दबल्याची शंका व्यक्त होत असून, ही परिस्थिती थेट इंग्रजांच्या हुकूमशाही राजवटीची आठवण करून देत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button