Uncategorized

महिलेवर अत्याचार महागाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात सारकिंनही या गावात एका महिलेवर 30 /4/ 2025 चे रात्री 12:30वाजता ते 20/6/2025 रोजी पर्यंत पीडित महिलेवर घरा शेजारी राहणारा आरोपी हा सतत दोन महिन्यापासून वाईट उद्देशाने पहात असून तुझ्याशी बोलायचे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणतो दि -20-4-2025 रोजी रात्री 12:30 दरम्यान ती एकटी घरी असताना आरोपी विठ्ठल नथुजी जाधव हा घरी येऊन तिला जबरदस्तीने त्याच्या घरी नेले कपडे काढून तोंड दाबून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही घटना कोणाला सांगशील तर तुला जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिली आरोपी हा नेहमी रात्री बे रात्री पीडित महिलेसोबत जोर जबरदस्ती करून वारंवार शारीरिक संबंध करत होता. 5-6-2025 रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान आरोपी याने पीडित महिलेला व तिच्या पतीला अपंगाचे प्रमाणपत्र यवतमाळ येथे शासकीय दवाखान्यातून काढून देतो असे म्हणून त्याने त्याच्या चार चाकी वाहनातून त्या दोघांना यवतमाळ येथे नेत असताना पीडित महिलेच्या पतीला जबरदस्तीने दारू पाजून पीडित महिले सोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्या पीडित महिलेने म्हटले की तुम्ही माझ्याशी जबरदस्ती करू नका मी माझ्या घरच्यांना सांगेल असे म्हटल्यावर त्यांनी त्यांना घरी सोडून दिले. आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडित महिलेने महागाव पोलीस स्टेशन येथे दी 20-6-2025 रोजी जबानी रिपोर्ट दिला. त्यावरून महागाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विठ्ठल नथू जाधव यांच्या विरोधात अप क्र:329/2025 कलम 64,64(2) (m ), 351(2) bns प्रमाणे गुन्हा नोंद करू आरोपीचा शोध सुनील अंभोरे साहेब करीत आहे .आरोपीला लोकेशन घेऊन तात्काळ अटक केल्या जाईल पीडित महिलेला न्याय मिळेल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!