नागपूर ते पंढरपूर सायकल स्वार निघाले पांडुरंगाच्या दारी

प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव शहरातून बायपास तुळजापूर नागपूर हायवे रोडने नागपूर ते पंढरपूर सायकल स्वारी मोठ्या उत्साहात प्रस्थान करण्यात आले सातशे किलोमीटर अंतर पार करत वारकऱ्याप्रमाणे सायकल स्वार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय गजरात पंढरपूर रवाना झाले
महागाव शहरातून बायपासने 15 जून रोजी सायंकाळी जात असताना बायपास येथे त्यांचे स्वागत करण्यात आले पंढरपूर कडे जाताना सायकल स्वार यांनी आमचे चौथे वर्ष असून पहिल्या वर्षी 2 जणांनी सुरुवात केली होती या वारिस दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे .दुसऱ्या वर्षी 15 व तिसऱ्या वर्षी 50 आणि यावर्षी 100 सायकल स्वार सहभागी झाले आहेत.त्यामध्ये दहा महिला वयोवृद्ध पुरुष उल्लेखनीय सहभाग आहे.वारीचा प्रारंभ नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला टायगर ग्रुप ऑफ एडवेंचर नागपूर व क्रीडा भारती यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या या सायकल स्वारीस महाराष्ट्रातील विविध भागातून सायकलपट्टूंनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.या वारीचा समारोप 22 जून रोजी पंढरपूर येथे होणार आहे.त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्र तसेच भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून साडेतीन हजार सायकल पट्टू सहभागी होणार आहेत सुप्रसिद्ध सायकलपटू डॉक्टर अमित समर्थ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या वारीमुळे पर्यावरण संवर्धन आरोग्य प्रबोधन फिटनेस आणि वारकरी संस्कृतीचा संदेश समाजात त पोहोचण्याचा मोठा प्रयत्न होत असून महागाव वाशी स्वप्निल अडकिने विजय सूर्यवंशी संजय पाटे सुनील नरवाडे तेजस नरवाडे अक्षय नरवाडे भलगे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहे.