Uncategorized

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या भुमिपुजनाचा दिखावा ?

शेख इरफान मुख्य संपादक मो.9021233696

उमरखेड शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः अस्थिपंजर अशी अवस्था आहे तसेच मराठवाडा विदर्भ यातील दुवा असणाऱ्या पुलाने आपली आयुष्य मर्यादा केव्हाच ओलांडलेली आहे .उमरखेड पुसद रोड ढानकी रोड सह शहरातील रस्तेअतिशय दुर्धर अवस्थेत असून शहरातील प्रत्येक वार्डात मुसळधार पावसाने घाण्याचे साम्राज्य तयार केलेले आहे याचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत असून आरोग्य यंत्रणा सुद्धा कुच कामी ठरत आहे आणि तोंडावर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाने विकास कामांच्या भूमिपूजनाचा गाजर जनतेच्या हाती देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे का ?
पाच वर्षांमध्ये न झालेले काम ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कसे शक्य होतील की आपापले कमिशन मिळण्यासाठी हा अट्टाहास तर नाही ना हा प्रश्न जनतेला पडलेला आहे कारण उमरखेड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोसी गावंडे महाविद्यालय पर्यंतचा रस्ता म्हणजे अत्यंत वर्दळीचा रस्ता या रस्त्याने अनेकदा कित्येक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी इतर प्रवासी वाहनांवरून पडून अपघात झाल्याचे वृत्त बऱ्याच वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले होते त्यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांना या कामास गती का देता आली नाही?
म्हणजे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाच्या भूमिपूजनाचे गाजर जनतेच्या हाती देत असल्याचे चर्चा नागरिकांत एका वयास मिळत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!