मिलिंद महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192
उमरखेड : तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा राज्यशास्त्र विभागाचा स्थानिक स्वराज्य संस्था अभ्यास दौरा नुकताच पार पडला .बीए भाग तीन च्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत प्रशासन याचा अभ्यास करण्याकरता उमरखेड तालुक्यातील सुकळी ग्रामपंचायत ला नुकतीच भेट दिली .तसेच या ग्रामपंचायतीतील प्रशासन व्यवस्था यावर लघु प्रकल्प सुद्धा विद्यार्थ्यांनी केला आहे . महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेतील तिसरा स्तर म्हणजे ग्राम पंचायत होय सत्तेच्या विकेंद्रीकरणा बरोबर ग्रामपंचायतीला व ग्रामसभांना आज महत्त्वपूर्ण स्थान आलेले आहे ग्रामपंचायतीची लोकसंख्या सदस्य संख्या महिला सदस्य संख्या ग्राम पंचायती द्वारा घेण्यात येणाऱ्या बैठका ग्रामसभा शासनाच्या विभिन्न योजनांची अंमलबजावणी यामध्ये येणाऱ्या अडचणी ग्रामपंचायतीची कार्य या सर्व बाबींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी लघु प्रकल्पातून केला यावेळी सुकळी गावच्या सरपंच कौशल्या चंद्रवंशी , उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव , ग्राम विकास अधिकारी संगीता भांडवले ,ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कांबळे , विठ्ठल चंद्रवंशी यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला . प्रत्यक्ष

ग्रामपंचायत प्रशासन व्यवस्था याचा अभ्यास या प्रकल्पांतर्गत करण्यात आला या संपूर्ण अभ्यास दौरा आणि प्रकल्पाच्या संदर्भात प्रा . ज्योती खंदारे ‘ राज्यशास्त्र विभाग प्रमुख मिलिंद महाविद्यालय मुळावा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले व तसेच अभ्यास दौऱ्यामध्ये मराठी विभाग प्रमुख तथा साहित्यिक प्रो. डॉ . अनिल काळबांडे यांचा देखील सहभाग होता . बीए भाग 3 राज्यशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी याअभ्यास दौऱ्यामध्ये आणि लघु प्रकल्पामध्ये सहभागी झालेले होते .