शिक्षणाचा दर्जा उंचवणारी कामगिरी: पोफाळीच्या श्री शिवाजी विद्यालयाचे इयत्ता ७ वीच्या

स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश; १८ पैकी १७ विद्यार्थी पात्र
उमरखेड
श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसद द्वारे संचलित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोफाळी येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत चमकदार कामगिरी करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत शाळेचे तब्बल १८ पैकी १७ विद्यार्थी पात्र ठरले असून संपूर्ण परिसरातून त्यांच्या या घवघवीत यशाचे कौतुक होत आहे.
शाळेतून कु. सानिका संभाजी नरवाडे हिने ७८% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कुं .आराध्या गजानन सूर्यवंशी हिने ७६% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर देवांश अविनाश दोडके 75 टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळवला तर अक्षरा राजेश शिंदे, आशुतोष कनवाळे, अस्मिता काळे, मारोतराव नरवाडे,मोहिनी महाजन, नंदिनी सूर्यवंशी, राधिका बचने, रिजवान पठाण,सई चंद्रवंशी, श्रुती पाईकराव,सूर्यप्रकाश कनवाळे, सुयोग बर्डे, वैष्णवी पावले, युवराज कलगुंडे या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांनीही आपापल्या गुणानुक्रमानुसार उत्तम श्रेणी मिळवत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर,सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर, चेअरमन विमलताई शिलार, प्राचार्य अवधूत देवसरकर, रवि शीलार, पर्यवेक्षक सुरेश सुरोशे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. या यशामुळे पोफाळी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा मोहर उमटली असून भावी वाटचालीसाठी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोबत फोटो



