शैक्षणिक

उर्दू प्राथमिक मुलींच्या शाळेतील प्रकार प्रभारी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार शालेय पोषण आहाराच्या तांदळाची अफरातफर

शेख इरफान मुख्य संपादक मो.9021233696

उमरखेड : येथील नगरपालिकेच्या डॉ. इकबाल उर्दू प्राथमिक मुलींच्या शाळेतील पोषण आहाराच्या ३० कट्टे तांदळाची प्रभारी मुख्याध्यापकाने अफरातफर करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्याने उमरखेड पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मुमताज खान रियासत खान रा. तातार शहा वाँर्ड असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. मुमताज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० डिसेंबर २०२४ ला शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सुरू होती.
यावेळी शालेय पोषण आहाराचे साहित्य घेऊन एक वाहन आले.
या वाहनात तीस कट्टे तांदूळ व अन्य साहित्य होते. हा तांदूळ पाचव्या वर्गाच्या खोलीत ठेवण्यात आला.तसेच अन्य साहित्य गोदामात ठेवले. यावेळी गोदामात ४० ते ५० कट्टे तांदूळ शिल्लक होता. यासह अन्य दोन खोल्यामध्ये विवादित तांदळाचे ६० ते ७० कट्टे शिल्लक असल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रभारी मुख्याध्यापकाने रविवार, २९ डिसेंबरला शाळेला सुट्टी असल्याची संधी साधून एका शिक्षकाच्या मदतीने संगनमत करून टाटा एस वाहनातून तांदळाचे ३० कट्टे परस्यर लंपास केले. हा सर्व प्रकार शाळेत नवीन सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर ही माहिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुमताज खान यांना दिली. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोहम्मद इशाद अब्दुल सत्तार यांना घेऊन ३ जानेवारीला शाळेची पाहणी केली. तेव्हा पोषण आहाराचे तीस कट्टे निदर्शनास आले नाही. याप्रकरणी तक्रारकर्त्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाला फोनवर विचारणा केली, त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यासिम बानू मोहम्मद खुशतर यांना प्रभारी मुख्याध्यापकावर यापूर्वीच संशय होता. असे तक्रारीत नमूद आहे. सदर प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापक व शाळेतील साहाय्यक शिक्षकाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या मुमताज खान रियासत खान यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
चौकट

तक्रारीत तथ्य नाही: प्रभारी मुख्याध्यापक

शाळा व्यवस्थापन सदस्यांनी केलेल्या तक्रारीत कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही. असा कोणताही प्रकार घडला नाही. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी केलेली तक्रार ही गैरसमजुतीतून झाली आहे. मी येथे प्रभारी मुख्याध्यापक आहे. माझ्यापेक्षा अनुभव असलेले शिक्षक येथे कार्यरत आहेत.

  • जुबेरखान नजीरखान, प्रभारी मुख्याध्यापक
    डॉ. इकबाल उर्दू प्रा. मुलींची शाळा उमरखेड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!