शैक्षणिक

पुसद येथे गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा मान्यवरांची उपस्थिती; ‘गणित संबोध’ परीक्षेतील गुणवंतांचा गौरव


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद तथा पुसद तालुका गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा येथील ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध गणित अभ्यासक प्रधान कुळकर्णी (मुंबई) यांनी “गणितावर बोलू काही” या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान प्रधान कुळकर्णी यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते. तसेच माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा गणित मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या ‘गणित संबोध’ परीक्षेतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी धिरज आडे होते. प्रमुख उपस्थितीत प्रधान कुळकर्णी, डॉ. सजल चिद्दरवार व ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने यांचा समावेश होता.
यावेळी अमित बोजेवार (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. पुसद), शितलकुमार वानखेडे (गटसमन्वयक), अभय पारखी (अध्यक्ष, जिल्हा गणित मंडळ), युवराज गेडाम (परीक्षाप्रमुख – गणित संबोध), पंजाबराव सुरोशे (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद पुसद), अशोक पोले (उपाध्यक्ष, जिल्हा विज्ञान मंडळ), बंडू खराटे (उपाध्यक्ष, जिल्हा गणित मंडळ), शिवशंकर घरडे (जिल्हा संघटक), चंद्रकांत ठेंगे (अध्यक्ष, पुसद तालुका विज्ञान मंडळ) तसेच प्रजापती सर (मुख्याध्यापक, ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूल), संजय सैंगर, रामभाऊ रोगे, सारंगे सर, वाघमारे सर आदी उपस्थित होते.
गणित प्रदर्शनीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. उपस्थित शिक्षकांनी प्रदर्शनीचा लाभ घेतला. कार्यशाळेत प्रधान कुळकर्णी यांनी वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत गणिताचे मानवी जीवनाशी असलेले नाते विविध उदाहरणांतून स्पष्ट केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे उपस्थित शिक्षकांमध्ये गणिताविषयी नव्याने उत्सुकता निर्माण झाली.
या कार्यशाळेमुळे गणित शिक्षक, मान्यवर व आयोजक यांच्यातील गणित विषयावरील कुतूहल अधिक दृढ झाले. मोठ्या संख्येने शिक्षकांनी कार्यशाळेचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सतिष जाधव यांनी केले. प्रास्ताविक उमेश इंगळे यांनी तर आभार जयवंत मोटे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पुसद तालुका गणित अध्यापक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूल प्रशासनाचे शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद यांच्या वतीने आभार मानण्यात आले. गणित कार्यशाळा उत्साहात व सकारात्मक वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button