हिमायतनगर विशेष: गरिबांच्या घरकुलाला प्रशासकीय ‘ग्रहण’; दोन वर्षांपासून वाळू लिलाव ठप्प!

हिमायतनगर ता़ प्रतिनिधी शेख खयुम खूरेशी
खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांचे ‘अर्थ’पूर्ण मौन; वाळू माफियांनी लुटले गरिबांचेस्वप्न!
एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार ‘पंतप्रधान आवास योजने’च्या (PMAY) माध्यमातून गरिबांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन देत आहे. मात्र, हिमायतनगर मध्ये या योजनेचा बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने वाळूचे लिलाव रखडवून ठेवल्याने घरकुलांचे काम मातीमोल झाले आहे. गरिबांच्या घरासाठी आलेल्या निधीवर आता वाळू माफिया डल्ला मारत असून प्रशासन मात्र सुस्त आहे.
वाळू लिलाव का रखडले? संशयाची सुई प्रशासनाकडे!
हिमायतनगर मध्ये दोन वर्षांपासून वाळूचे अधिकृत लिलाव झालेले नाहीत. लिलाव न झाल्यामुळे अधिकृत वाळू उपलब्ध नाही, याचाच फायदा घेत वाळू माफियांनी सोन्याच्या दराने वाळु विकण्यास सुरुवातकेली आहे.
प्रश्न १: अधिकृत लिलाव का केले जात नाहीत? कोणाच्या फायद्यासाठी ही दिरंगाई सुरूआहे?
प्रश्न २: अधिकृत वाळू बंद असताना माफियांकडे वाऴु येते
प्रश्न ३: गरिबांच्या घरकुलाचा पैसा घरासाठी की माफियांच्या हप्त्यासाठी?
सामान्य जनता भरडली, माफियांची चांदी!
घरकुल योजनेतील लाभार्थी हतबल झाले आहेत. “साहेबांनी घरकुल दिलं पण वाळू चोरली,” अशी संतप्त प्रतिक्रिया हिमायत नगरची जनता देत आहे. वाऴूअभावी शेकडो घरांची बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. चढ्या दराने वाळू विकत घेणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे.



