Uncategorized

महागाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या पिंपरी शिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी घटना घडली आहे. विजय अवधूत कदम (रा. महागाव) हे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ पासून घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह पिंपरी शिवारातील दत्तोबाच्या टेकडीजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
ही घटना जनावरं चारणाऱ्या नागरिकाच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिल्यानंतर शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी महागाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद (मार्ग क्र. ६) करण्यात आली असून पुढील तपास एडकर जमादार करीत आहेत.
मृत विजय कदम यांच्याकडे शेती असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा संतोष विजय कदम यांनी महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
महागाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, मात्र शेतकऱ्यांच्या जोडधंद्यासाठी किंवा त्यांच्या मूलभूत समस्यांवर प्रशासनाकडून ठोस सहकार्य होताना दिसत नाही. शेतीविषयक प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, अनुदानांचे प्रलंबित प्रस्ताव, कृषी विभाग व महसूल यंत्रणेतील समन्वयाचा अभाव यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याची ही घटना मोठी शोकांतिका ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button