लाडकी बहिण योजनेतील इ- केवायसी (e-kyc) मधील तांत्रिक त्रुटी दूर

लाडक्या बहिणींच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार -सौ.राधाबाई भीमराव कामारकर.
एस पी दळवी
उमरखेड:-
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक आणि संवेदनशील पाऊल उचलले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सौ.राधाबाई भीमराव कामारकर यांनी महिलांच्या वतीने मांडलेल्या मागणीची दखल घेत इ-केवायसी (e-kyc) प्रक्रियेमधील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागाने निवेदनाची तत्परतेने दखल घेत ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नवीन शासन परिपत्रक जारी केले, या परिपत्रकानुसार ज्या महिलांनी
३१ डिसेंबर २०२५ इ- केवायसी (e-kyc) पूर्ण केली होती मात्र तांत्रिक कारणांमुळे चुकीची माहिती नोंदणी केली होती त्यांना आता३१ मार्च २०२६ पर्यंत माहिती दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे यासाठी पोर्टलमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.”प्रशासनाने महिलांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेतला आहे ही समाधानाची बाब आहे, इ- केवायसी (e-kyc)दुरुस्तीच्या संधीमुळे अनेक गरजू महिलांना त्यांचा हक्क मिळणार आहे, महिलांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शासन आणि संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानून या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन करून सौ. राधाबाई भिमराव कामारकर यांनी शासनाकडून घेण्यात आलेल्या सदर निर्णयाबाबत आभार व्यक्त करून इ- केवायसी मधील तांत्रिक त्रुटीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने आपली इ-केवायसी (e-kyc) करून घ्यावी अशी विनंती केली आहे.



