Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorizedमहाराष्ट्र

वडार समाजाच्या न्याय्य मागणीला यश; रॉयल्टी सवलतीची मर्यादा २०० वरून ५०० ब्रास

नगरसेविका सौ.खुशबू मेंढे व भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन मेंढे यांचा प्रभावी पाठपुरावा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802





वडार समाजाच्या पारंपरिक दगडफोडी व गौण खनिज उत्खनन व्यवसायासाठी रॉयल्टी सवलतीची वार्षिक उत्खनन मर्यादा २०० ब्रासवरून ५०० ब्रास करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मंजुरी दिली आहे. यासोबतच संबंधित महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिज) नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी वडार समाजाचे नेते तथा भाजपा युवा मोर्चा उमरखेड शहराध्यक्ष पवन मेंढे आणि नगरसेविका सौ.खुशबू मेंढे यांनी वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची यवतमाळ येथे भेट घेऊन निवेदन सादर केले होते. समाजाच्या पारंपरिक व्यवसायाशी संबंधित अडचणी व समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली होती.
या पाठपुराव्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाने २०० ब्रासची मर्यादा वाढवून ५०० ब्रास करण्याचा निर्णय घेतल्याने वडार समाजातील कष्टकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पवन मेंढे आणि नगरसेविका खुशबू मेंढे यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या पुढाकाराचे व केलेल्या पाठपुराव्याचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. समाजाच्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्या मागण्यांसाठी सातत्याने भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरला आहे.
तसेच ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली वडार समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे महत्त्वाचे यश मिळाले आहे.
या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आणि महाराष्ट्र शासनाचे समस्त वडार समाजाच्या वतीने मनःपूर्वक आभार! हा निर्णय वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला आधार देणारा आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणारा आहे.

चौकट-:

वडार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित रॉयल्टी सवलतीची मर्यादा २०० वरून ५०० ब्रास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महायुती सरकारने वडार समाजाच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली आहे. काही दिवसापूर्वीच आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे याबाबत निवेदन दिले होते आणि अवघ्या काही दिवसांत शासनाने या मागणीवर निर्णय घेतला. त्यामुळे महायुती सरकारच्या संवेदनशील आणि सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी वडार समाजाच्या कष्टकरी बांधवांच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. हा निर्णय समाजासाठी दिलासादायक असून, शासन आणि समाज यांच्यातील सकारात्मक संवादाचे हे उदाहरण आहे. वडार समाजाच्या उर्वरित न्याय्य मागण्यांसाठीही आम्ही शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहू.

श्री. पवन मेंढे
विभागीय जिल्हाध्यक्ष,
मी वडार महाराष्ट्राचा संघटना,
यवतमाळ जिल्हा


Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button