Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
शहर

हिमायतनगर: लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याची मागणी; बनावट कामगारांवर कारवाई करण्याची नगर पंचायतीकडे मागणी
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर शहरातील सर्व कामगारांच्या लेबर कार्डची मुदत संपल्यामुळे, त्यांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नगर पंचायत कार्यालयाकडून लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी कामगारांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कडक उन्हात, पावसात आणि अहोरात्र घाम गाळून कष्टाचे काम करणाऱ्या खऱ्या आणि प्रामाणिक बांधकाम कामगारांनाच शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, सध्या काही भोगस व बनावट व्यक्ती कामगार असल्याचे भासवून योजनांचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा बनावट मिस्त्र्यांवर व कामगारांवर नगर पंचायत प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि केवळ खऱ्या, पात्र कामगारांनाच सर्व कागदपत्रे व लाभ उपलब्ध करून द्यावेत, असा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या हक्कांच्या चौकटीत राहून लेबर कार्डचे नूतनीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. नगर पंचायत कार्यालयाकडून मिळणारी आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने नूतनीकरणाचे काम रखडले असल्याचे कामगारांनी निवेदनात नमूद केले आहे. या समस्येचा प्रशासनाने सहानुभूतीने विचार करून सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्यावीत आणि कामगारांची होणारी अडचण थांबवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button