बोगस डॉक्टरवर आरोग्य विभागाची कारवाई
मुडाणा येथील प्रकार; महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
— महागाव तालुक्यातील मुडाणा येथे बोगस डॉक्टर म्हणून कथितरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर आरोग्य विभागाचे पथक मुडाणा येथे दाखल झाले. संबंधित ठिकाणी पंचनामा करून विविध साहित्य जप्त करण्यात आले.
आरोग्य विभागाच्या पथकाने कथित बोगस डॉक्टरच्या घरावर धाड टाकून तपासणी केली. यावेळी त्याच्या ताब्यातील स्टेथोस्कोपसह विविध अॅलोपॅथी औषधे व इंजेक्शन जप्त करण्यात आले. तसेच घराची पाहणी केली असता रुग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कक्षासह तीन खाटांचे अंतरंग रुग्णविभाग सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोंदणी अथवा परवानगी नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्नजित धुळेधुळे यांच्या फिर्यादीवरून उज्ज्वल जगदीश ठाकूर यांच्याविरुद्ध महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महागाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे करीत आहेत.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



