
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोलीस स्टेशन महागाव शहर व ग्रामीण हद्दीत गांजा, एमडी तसेच इतर अमली पदार्थांची विक्री, खरेदी, वाहतूक अथवा सेवन करणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याचे जाहीर आवाहन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी नागरिकांना केले आहे. हे पहिले ठाणेदार महागावचे ठरले आहे
महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणतीही व्यक्ती अमली पदार्थांची विक्री, खरेदी, वाहतूक किंवा सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमली पदार्थांच्या सेवनामुळे विशेषतः युवक व विद्यार्थ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होण्यासोबतच सामाजिक वातावरणावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमली पदार्थांच्या गैरप्रकाराची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अमली पदार्थांची विक्री, वाहतूक अथवा सेवनाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी मोबाईल क्रमांक 8766065335 वर संपर्क साधावा.
नागरिकांनी कोणत्याही भीती अथवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांच्या गैरप्रकाराची माहिती पोलिसांना द्यावी आणि समाजातील युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, पोलीस स्टेशन महागाव यांनी केले आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



