Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागावशहर

नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; महागाव पोलिसांत तक्रार
बोगस नियुक्ती आदेश दाखवून फोन-पे, बँक खात्यात पैसे वर्ग; तीन व्यक्तींच्या तक्रारी दाखल

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळल्याची तक्रार महागाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नोकरी मिळेल या आशेने काही बेरोजगारांकडून फोन-पे, बँक खात्यात रक्कम वर्ग करून घेण्यात आली, तर काहींकडून रोख स्वरूपात पैसे घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींनी नोकरी लावून देण्याचे सांगून कथित बोगस नियुक्ती आदेश व पोलीस खात्याशी संबंधित कागदपत्रे दाखवून बेरोजगारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध कारणे सांगून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात तीन व्यक्तींनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासण्यात येत आहे.
याबाबत महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी, “अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या प्रकरणाचे चौकशी अधिकारी एपीआय जाधव यांनी ६ ऑक्टोबर रोजी प्रतिनिधीशी बोलताना लवकरच चौकशी पूर्ण करून प्रकरणातील तथ्य समोर आणले जाईल त्यांचे कॉल डिटेल काढणे सुरू असून अशा आरोपींना कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.
नोकरीच्या आशेने बेरोजगार तरुणांकडून मोठ्या रकमा उकळण्याचे प्रकार गंभीर असून, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button