Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव

उन्हाचा पारा वाढला; वस्तीतील फटाका गोदामे ठरू शकतात धोकादायक!
हिंगोलीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महागाव, उमरखेड, पुसद तालुक्यांतील गोदामांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना वस्तीमध्ये असलेल्या फटाक्यांच्या गोदामांमुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती यवतमाळ जिल्ह्यात होऊ नये, यासाठी महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यांतील वस्तीमध्ये असलेल्या फटाका गोदामांची तातडीने तपासणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या तालुक्यांमध्ये फटाके विक्रीचे परवाने असलेल्या काही विक्रेत्यांची गोदामे प्रत्यक्षात रहिवासी वस्त्यांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. फटाक्यांचा साठा, वाढते तापमान आणि रहिवासी वस्तीची जवळीक यामुळे नागरिकांच्या जीवितास तसेच मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
फटाक्यांचे गोदाम ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, गोदामाचे ठिकाण निर्धारित नियमांनुसार आहे का, तसेच अग्निसुरक्षा व साठवणुकीसंबंधी सर्व निकषांचे पालन केले जात आहे का, याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाचा पारा वाढत असताना फटाक्यांचा साठा असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील फटाका विक्रेत्यांचे परवाने, गोदामांची ठिकाणे, साठवणुकीची पद्धत आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तातडीने तपासणी करून पंचनामे करावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वस्तीतील फटाका गोदामांबाबत प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button