झाडे लावणे ही फक्त सुरुवात; योग्य व्यवस्थापनातूनच उत्तम उत्पादन
कासारबेहळ येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिर; फळबाग व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव : प्रतिनिधी संजय नागरगोजे
झाडे लावणे ही केवळ सुरुवात असून, लागवडीनंतरची योग्य निगा, पाणी व खत व्यवस्थापन, छाटणी तसेच कीड-रोग नियंत्रणाकडे लक्ष दिल्यास झाडांची वाढ आणि उत्पादनात निश्चितच सुधारणा करता येते, असा संदेश कासारबेहळ येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण शिबिरातून देण्यात आला.
महागाव तालुक्यातील कासारबेहळ येथील वाघाई माता मंदिर परिसरात सेट्रीज संस्थेच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फळबाग लागवडीनंतर करावयाच्या विविध व्यवस्थापन पद्धतींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकल्पाचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक गंगाधर स्वामी यांनी केली. लागवडीनंतर झाडांची योग्य निगा राखणे, पाणी व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, छाटणी, कीड व रोग नियंत्रण तसेच झाडांची संतुलित वाढ याबाबत त्यांनी माहिती दिली.
प्रशिक्षणादरम्यान रेणुका नागले यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. फळबागेची नियमित देखभाल कशी करावी, झाडांची वाढ आणि उत्पादन कसे वाढवावे, तसेच बदलत्या परिस्थितीनुसार शास्त्रीय पद्धतींचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ‘योग्य निगा, योग्य व्यवस्थापन आणि उत्तम उत्पादन’ या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी लागवडीनंतर झाडांकडे सातत्याने लक्ष दिल्यास उत्पादनक्षम फळबाग उभी करता येते, असे नितीन रिठे यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिराला कासारबेहळ, वरोडी, टेंभी, पिंपरी, अंबोडा आणि अनंतवाडी परिसरातील फळबाग लागवड केलेले शेतकरी तसेच प्रतिष्ठित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना फळबाग व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धतींची माहिती मिळून प्रत्यक्ष शेतीत त्याचा उपयोग करण्यास मदत होणार आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802



