Uncategorized
सोनारी फाट्यावर गतिरोधक बसवा; अपघातात बळी जात असल्याने दत्ता पाटील सोनारीकर यांचा ‘रस्ता रोको’चा इशारा

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
हिमायतनगर( तालुका प्रतिनिधी: शेख खय्यूम)
हिमायतनगर जवळील सोनारी फाटा हा चार रस्त्यांचा मुख्य चौराहा (फोर पॉईंट) भीषण अपघातांचा केंद्रबिंदू ठरत आहे. या ठिकाणी वाहने अत्यंत वेगात धावत असल्याने अपघात घडल्यास माणसाला वाचण्याची संधीच उरत नाही. आतापर्यंत येथे अनेक निष्पाप नागरिकांचे नाहक बळी गेले आहेत.
प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरोधात शेतकरी नेते दत्ता पाटील सोनारीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनारी फाट्यावर अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दोन्ही बाजूंनी मजबूत गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांसह तीव्र ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802