शहर

महागाव नगरपंचायतीतील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती गठीत; कारवाई अटळ


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत हद्दीत २५ ऑगस्ट २०२३ पासून विविध विकासकामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत आदेश काढून चौकशी समिती स्थापन केली आहे.
या समितीमार्फत २५ ऑगस्ट २०२३ पासून आजपर्यंत नगरपंचायतीत झालेल्या सर्व विकासकामांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
चौकशी समितीची रचना पुढीलप्रमाणे :
अजित कुमार येळे – उपजिल्हाधिकारी, यवतमाळ (अध्यक्ष)
अजय कुरवाडे – मुख्याधिकारी, नगरपंचायत उंबरखेड (सदस्य)
पूनम धिंगाणे – सहाय्यक संचालक (सदस्य)
मोहन गाडगे – निधी अधिकारी (सदस्य)
या समितीच्या नियुक्तीमुळे महागाव नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला गती मिळणार असून, नगराध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांचे तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
चौकशीत भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास संबंधित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी थेट चौकशीचे आदेश देऊन समिती नेमल्यामुळे महागाव नगरपंचायतमधील पदाधिकारी व संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button