आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा तथा प्रथम नागरिक सौ. सुनंदा दिलीपराव कोपरकर सुरोशे व नगरसेविका सौ. सुरेखा विनोदराव कोपरकर सुरोशे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

शिबिरात ANC 39, PNC 17, NCD screening 52, किशोरवयीन 32, बाल आरोग्य तपासणी 23 इतक्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांची रक्तदाब, शुगर, सिकलसेल, रक्तक्षय, कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग तसेच गरोदर व स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली.

याशिवाय महिलांना पोषक आहार, लसीकरण, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आभा कार्ड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आहार प्रदर्शनी व शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच Ni-kshay एन्ट्री व SNSP पोर्टल एन्ट्री पूर्ण करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राहुल जाधव (वैद्यकीय अधिकारी), शिकारे (वैद्यकीय अधिकारी), बाबुराव जारंडे (आरोग्य निरीक्षक), किरण राठोड सी . एच .ओ ,बाळासाहेब तांदळे, पाचखेडे सी . एच .ओ .प्रभाकर मोरे, लाभशेडवार आरोग्य सेवक, पिंपळे आरोग्य सेवक ,उत्तम पुरी, आरोग्य विभागाचे कर्मचारी व मोठ्या संख्येने आशा वर्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button