Uncategorizedआरोग्य

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी महागाव तालुक्यात औषध दुकाने बंद


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या आवाहनानुसार बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी महागाव तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महागाव तालुका औषधी विक्रेता संघाने तहसीलदार महागाव यांना निवेदन सादर केले.
निवेदनात ऑनलाइन औषध विक्री, इंटरनेट फार्मसी, ई-पोर्टलद्वारे होणारी औषध विक्री तसेच केंद्र शासनाच्या काही अधिसूचनांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शासन व प्रशासनाने या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यातील औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आवश्यक असल्यास महागाव तालुका औषधी विक्रेता संघाचे पदाधिकारी सहकार्य करतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
या निवेदनाच्या प्रती पोलीस स्टेशन महागाव व ग्रामीण रुग्णालय महागाव येथे देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button