शहर

वंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारिणीसाठी बैठक संपन्न

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ पश्चिम जिल्हा अध्यक्ष डी के दामोधर यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाव तालुका व शहर कार्यकारणी गठित करण्या साठी शासकीय विश्रामगृह महागाव येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हा सचिव रामराव कांबळे, जिल्हा सदस्य मंगल खराटे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुका कार्यकारणी मध्ये काम करू इच्छिणाऱ्या अनेकांचे अर्ज भरून घेण्यात आले या बैठकीस विजय लहाने , प्रल्हाद नवसागरे, गणेश पाईकराव, कुमार कांबळे, पंजाब सरदार, विलास कांबळे ,पप्पू कावळे, वंदनाताई भवरे, गुणानंद मानकर,दिगंबर चिभडे, नामदेव लहाने, गोफणे. व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button