Uncategorized

सलग चौथ्या वर्षी अदिती अबॅकस चा बक्षीस वितरण सोहळा साजरा*

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
चाणक्य अबॅकस तर्फे 17 वी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महागाव येथील अदिती अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मोठ्या गटातून प्रणिती आडे हिने पहिला क्रमांक ,अवंती चोंडी कर हिने द्वितीय तर ज्योतिरादित्य पवार यांनी तृतीय कृपांक पटकवला आहे. त्याचप्रमाणे समर्थ देशमुख, सुयश कदम ,सुजल कदम ,नैतिक चंदापुरे यांनी विशेष प्राविण्यसह बक्षीस मिळविले आहेत. त्यानंतर राजवी ढेपे, स्वरा देशमुख ,हर्ष देशमुख, गजानन कदम या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी पर नक्ष कांबळे ,संजीवनी देशमुख अवनी ढेपे ,कृतिका पवार, श्रावणी देशमुख ,आराध्य आढाव, रितवी देशमुख ,शिवांश वानखेडे ,इंद्रनील देशमुख ,सिद्धी देशमुख या विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन बक्षीस मिळवले आहे. या स्पर्धेचे बक्षीश वितरण आज महागाव येथे करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महागाव नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ. सुनंदा कोपरकर मॅडम नगरसेविका मा. श्री जयश्रीताई नरवाडे टी .जी.देशमुख महाविद्यालयाचे सन्माननीय शिक्षक श्री आढाव सर, माजी नगरसेवक श्री राजूभाऊ राठोड व सौ. मेघा पवार मॅडम वैशालीताई देशमुख मॅडम यांनी आवर्जून आपली उपस्थिती कार्यक्रमाला दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या बक्षीसांसाठी आणि कार्यक्रमाची खास आकर्षण विद्यार्थ्यांचे डेमो यांची मान्यवरांनी आणि पालकांनी भरभरून कौतुक केले मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना अबॅकस शिकवणे ही काळाची गरज आहे. अबॅकस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकासाला कशी चालना मिळते याबाबत त्यांनी आपले विचार मांडले आजची पिढी ही आकडे मोडी साठी पूर्णपणे कॅल्क्युलेटर सारख्या साधनावर अवलंबून आहे ही स्थिती पुढील पिढीची होऊ नये तसेच पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची या पिढीमध्ये क्षमता यावी यासाठी आजच प्रयत्न करायला हवा.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन अबॅकस क्लासेसच्या संचालिका कुमारी शितल मॅडम यांनी केले व प्रतीक्षा चंदापुरे यांनी आभार प्रदर्शन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मान्यवर आणि पालकांचे सहकार्य लाभल्याबद्दल चोंडी कर मॅडम यांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button