Uncategorized

बा. ना. सूतगिरणीची आमसभा वादळी ठरण्याचे संकेत!

पंजाबराव देशमुख खडकेकर, डॉ. मोहम्मद नदीम सुतगिरणीच्या अध्यक्षांकडे अपारदर्शकतेवर आधारित पंचवीस गंभीर प्रश्न उपस्थित करणार.

महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीला उतरती कळा लागली आहे. विदर्भातील एकेकाळी नावारूपाला आलेली ही सूतगिरणी बाहेरच्या लोकांना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावी लागली. यामुळे स्थानिक सहकार क्षेत्रातील नेत्यांचे अपयश स्पष्ट झाले आहे. 23 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या सूतगिरणीच्या सर्वसाधारण सभेत सूतगिरणीचे आर्थिक नियोजनातील अपयश, बेकायदेशीर निर्णय आणि कार्यप्रणालीतील अपारदर्शकतेवर आधारित पंचवीस गंभीर प्रश्न या वेळी पंजाबराव देशमुख खडकेकर आणि डॉ. मोहम्मद नदीम यांच्याद्वारे अध्यक्षाकडे चर्चिल्या जाणार आहेत, त्या मुळे ही सभा वादळी ठरणार का? या कडे सहकार क्षेत्रात चर्चा आहे.
एनसीडीसी या वित्तीय संस्थेचे सूतगिरणीने आज पर्यंत कर्ज काढल्यापासून किती वेळा मुदतीत कर्ज न भरता मुद्दत वाढ घेतली. त्या पोटी सूतगिरणीस दंडात्मक एकूण जादा व्याज किती भरण्यात आले. ज्यादा रक्कम भरण्यात आली त्यास जबाबदार कोण? आज रोजी मुदत संपल्यानंतर गिरणीकडे किती कर्ज बाकी आहे, यास जबाबदार कोण? दिमलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून मागील वर्षात व चालू आर्थिक वर्षात बँकेत जमा असलेले डिपॉझिट पैकी किती रक्कम सूतगिरणीस मिळाली. त्या रकमेतून विजेचा खर्च भागविण्यासाठी सोलर पॅनल लावून दर महिन्याला 50 लाख रुपये वीज बिल का वाचविले नाही, या बाबत जबाबदार कोण? एम.आय. पात्री कार्यकारी संचालक यांनी सूतगिरणी मध्ये गैरव्यवहार होत असताना संचालक मंडळाच्या सभेमध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून स्वतःचे विरोधात मत लेखी स्वरूपात का नोंदविले नाही, यास जबाबदार कोण? बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीच्या आतापर्यंत नवीन निवडणूक संपन्न झाल्यानंतर किती संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे दिले, ते का दिले याबाबतची माहिती पुरविण्यात यावी. बाबासाहेब नाईक सूतगिरणीची पूर्ण प्रकल्पाची आज रोजी अंदाजे किंमत किती, आज रोजी सूतगिरणी पन्नास कोटी रुपये तोट्यात आहे, हा तोटा संचालक मंडळ किती रुपये तोटा होईपर्यंत सूतगिरणी चालू ठेवणार आहेत, तोटा वाढल्यानंतर सूतगिरणी चालविण्यास किंवा विक्री द्वारे कोणीच घेणार नाही, ही व्यवस्था करण्याचे संचालक मंडळाचे धोरण आहे काय. मागील वर्षी आर्थिक वर्षात गिरणी प्रति महिना किती तोटा झाला, या जबाबदार कोण? दिमलकापूर अर्बन बँकेचे ठेवीचे तेरा कोटी रुपये मिळाले नसते तर अध्यक्ष म्हणून आपण पैशाचे नियोजन कसे करणार होते. बाबासाहेब नाईक सूतगिरणीच्या निविदा न काढताच सूतगिरणी आकोट येथील व्यापाऱ्यांना चालविण्यास दिली. या बाबत आपण आयुक्त वस्त्रोद्योग एनसीडीसी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शिखर बँक मुंबई अथवा शासनाची परवानगी घेतली होती काय? दहा लाख रुपयाच्या वर निविदा प्रकाशित करून भाडे तत्त्वावर देणे बंधनकारक असतांना नियमाचे उल्लंघन करून सूतगिरणी भाड्याने देण्यात आली,याला जबाबदार कोण? परत पुन्हा ही निविदा नकाढताच सूतगिरणी भाड्याने देण्याचा विचार अध्यक्ष किंवा संचालक मंडळ करीत आहे काय? बाबासाहेब नाईक सूतगिरणीकडे दोन वाहन चालक कायम सेवेत असतांना अध्यक्षांच्या गाडीवरील चालकाचा आता पर्यंत 2023, 24 या आर्थिक वर्षात किती पगार करण्यात आला, याला जबाबदार कोण? बाबासाहेब नाईक सूतगिरणी 2020- 21, 22, 23, 24, 25 या आर्थिक वर्षात दरवर्षी सूतगिरणीला प्रतिवर्ष किती तोटा होतो, याला जबाबदार कोण? दिमलकापूर अर्बन या बँकेत बेकायदेशीर रित्या सूतगिरणीची रक्कम ठेव म्हणून ठेवण्यात आली, ती नियमानुसार ठेवण्यात आली होती काय? ती बँक अवसायनात निघाल्यानंतर सूतगिरणीची आतापर्यंत मिळणाऱ्या व्याजाचे किती नुकसान झाले, त्याचं जबाबदार कोण? दि मलकापूर अर्बन बँकेकडून सूतगिरणीने ठेवलेल्या ठेवी पैकी सन 2021- 22, 23, 24, 25 या आर्थिक वर्षात किती रक्कम प्राप्त झाली. त्या रकमेचा कर्ज भरण्यासाठी अथवा इतर कर्ज भरण्यासाठी उपयोग न करता सूतगिरणी चालविण्याच्या बाबीकडे प्रथम लक्ष न देता इतर लोकांना रक्कम वाटण्यात आली, याला जबाबदार कोण? ज्यांना रक्कम अदा केली त्यांची यादी पुरविण्यात यावी. बाबासाहेब नाईक सूतगिरणी कन्व्हर्शन कॉस्टवर चालविण्यास निविदा प्रकाशित न करताच बेकायदेशीर रित्या देण्यात आली, त्यांनी कराराचे उल्लंघन करून मध्येच करार मोडीत काढला त्यास जबाबदार कोण? बाबासाहेब नाईक सूतगिरणी यापुढे भाडेतत्त्वावर देतांना ई- निविदा प्रकाशित करूनच देणार आहात काय, या बाबत संचालक मंडळाचे धोरण काय? बाबासाहेब नाईक सूतगिरणीच्या अहवालातील विषय क्र. 4 सन 2024 ,2025 चे अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्च झाला, त्यास आमचा विरोध नोंद करावा, कारण उत्पादन कमी आणि खर्च जास्त ही सूतगिरणीच्या पैशाची केलेली लूट आहे काय? एम.आय. पातरी यांनी सूतगिरणीची परिस्थिती हलाखीची असतांना सूतगिरणीच्या मालकीचे वाहन दुसऱ्या राज्यात कोणाच्या परवानगीने नेले, त्या वाहनास परत येतांना अपघात झाला, त्या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्या नुकसानीस जबाबदार कोण? एमआय पातरी यांनी सूतगिरणी कडून बेकायदेशीर ठराव घेऊन ज्या रकमा उचलल्या आहे, त्याची पूर्ण वसुली झाली आहे का, नसल्यास त्याला जबाबदार कोण? 4 एप्रिल 2025 रोजी संस्थेचे अध्यक्ष यांना माहिती मागितली होती, ती माहिती सूतगिरणीचा सभासद असतांना का पुरविण्यात आली नाही, याला जबाबदार कोण? आज रोजी व्यापारी देण्यापैकी कापूस गाठीचे देणे किती, स्टोअरच्या व्यापाऱ्याचे देणे किती, कामगाराचा व कर्मचाऱ्यांचा थकीत पगार किती, कर्मचाऱ्यांची किती देणे बाकी आहे. एनसीडीसीचे थकीत कर्ज आजच्या तारखेत किती आहे, ही जबाबदारी संचालक मंडळाची आहे काय, यासाठी संचालक मंडळाने काही उपाययोजना केली आहे काय? अहवाल वर्षात कामगार वाहतूक खर्च उत्पादन कमी असतांना ज्यादा वाहतूक खर्च होण्याची कारणे काय, कामगार प्रोत्साहन खर्च ज्यादा होण्याची कारणे काय, कापूस गाठ खरेदी व इतर खर्च ज्यादा होण्याची कारण काय संचालक प्रवास खर्च, वाहन डिझेल खर्च, स्टेशनरी व छपाई खर्च, लिगर खर्च, टॅक्सी खर्च, संगणक खर्च, इंटरनेट खर्च ज्यादा होण्याची कारणे काय. मागील आर्थिक वर्षात 34 कोटीच्या आसपास तोटा असतांना दिमलकापूर अर्बन बँकेचे पैसे मिळूनही तोटा 453959982.40 एवढा होण्याचे कारणे काय, यास जबाबदार कोण? बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे एकूण सभासद किती, त्यापैकी किती लोकांकडे सभासद असूनही जमीन उपलब्ध नाही, त्यांची यादी देण्यात यावी. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील सूतगिरणी कमी मशीनवर जास्त उत्पादन काढून नफ्यात चालू आहे, हे खरे आहे काय? यवतमाळ जिल्ह्यातील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी 42 कोटी रुपयात 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर दिल्ली, हे खरे आहे काय? असल्यास या वरून आपण सूतगिरणीच्या बाबतीत काही ठोस व धोरणात्मक निर्णय घेणार आहात काय. सन 2023 च्या लेखापरीक्षण अहवालाची प्रत वाचून दाखविण्यात यावी. सन 2024, 25 या अहवाल वर्षातील लेखापरीक्षण का करण्यात आले नाही, यास जबाबदार कोण? वरील सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देऊन आमसभेत या संदर्भात चर्चा करण्यात यावी, असे बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे अध्यक्ष श्याम पाटील यांना 15 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून पंजाबराव खडकेकर आणि डॉ. मोहम्मद नदिम नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button