Uncategorizedसंपादकीय

श्री . क्षेत्र नवचंडी माता देवी संस्थान सवना येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ*

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील सवना येथील श्री नवचंडीका माता देवी संस्थान हे डोंगराळ निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. नवसाला पावणारी माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देवीच्या नवरात्र उत्सवाला भाविकांची मोठी मांदियाळी जमा होते.

यावर्षी प्रतिपदा सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी घटस्थापनेनंतर उत्सवाची सुरुवात करण्यात आली. नवरात्रातील नऊ दिवस दररोज सकाळच्या काकड आरतीसाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यवतमाळ, पुसद, महागाव, उमरखेड आदी ठिकाणांहून भक्त मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत.

या नवरात्र उत्सवात अष्टमी ३० सप्टेंबर २०२५ रोजी साजरी करण्यात येणार असून महा नवमी बुधवार विशेष अभिषेक पूजेनंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन श्री नवचंडीका संस्थानचे अध्यक्ष मधुकरराव टेकाळे, गणेश एल. देशमुख, प्रतापराव रा. देशमुख, अविनाश देशमुख, विश्वस्त सुभाषराव देशमुख, सखारामजी देशमुख, दत्तराव धावंडकर, रंगराव जाधव, गोविंदराव देशमुख, दत्तात्रेय भगवानराव नहातकर, दत्तराव नारायण देशमुख, माणिकराव सुदर्शन देशमुख आदींनी केले आहे.

तसेच सेवक गजानन माने, शिवशंकर सुरोशे, मंचकराव गोरे, ओम देशमुख, स्वप्निल लकडे, नारायण सुरोशे, मुन्ना देशमुख, गोपाळ सरसमकर, सुधाकर कदम, सुनील बोंविंदवाड, शुभम देशमुख, अतुल राठोड आदींच्या सहकार्याने उत्सवाचे आयोजन यशस्वी करण्यात आले आहे.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात धार्मिक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button