शैक्षणिक

प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था उमरखेड द्वारा संचालीत देशमुख महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय उमरखेड येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छ्ता अभियान .

अंधश्रद्धेला आळा घालुन विज्ञानवादी विचारसरणी जोपासली पाहिजे
सरोज देशमुख

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192






  प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था द्वारा संचलित देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय उमरखेड येथे भव्य प्रांगणना मध्ये संस्थेच्या संचालिका तथा जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव शिवमती सरोज ताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथि दिनानिमित्त अभिवादन करुन स्वच्छ्ता अभियान संस्थेच्या संचालिका तथा जिजाऊ ब्रिगेड प्रदेश सहसचिव शिवमती सरोज देशमुख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर प्रमुख 







पाहुणे म्हणून देशमुख काॕलेज चे प्रा. वानखेडे सर, प्रा.दुधे सर , श्री पतंगे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा  यांच्या प्रतिमेचे पूजन करून व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वतीने भाषण व गीते सादर करण्यात आली  . कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सरोज देशमुख यांनी विद्याथ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे आत्मसात केले पाहिजे.देव हा दगडात नसून माणसांत आहे आणि हे जग विज्ञानवादी आहे त्यामुळे आपण अंधश्रद्धेवर अजीबात विश्वास ठेवू नये तसेच श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी तसेच गावोगावी जाऊन अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारे, स्वच्छतेचा संदेश देणारे, शिक्षणाचा प्रचार व प्रसार आपल्या अभंगातून करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असे विद्यार्थ्यांना स्वच्छता व अंधश्रद्धेचे महत्त्व  सांगितले आपणच अंधश्रद्धेलाआळा घातला पाहिजे उद्याच्या देशाचे राष्ट्राचे पण भवितव्य आहात त्यामुळे आपला दृष्टिकोन हा विज्ञानवादी असले पाहिजे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.त्यानंतर सर्वांनी मिळून शालेय परिसर स्वच्छ केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांनी कु.वैष्णवी राऊत व कु.शुभश्री राऊत यांनी केले तर आभारप्रदर्शन कु‌‌.शुभश्री राऊत हिने केले. कार्यक्रमास पालक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!