तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहात संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
शहरातील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कूल, दहागांव येथे १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाल वैज्ञानिकांनी मोठा सहभाग घेत विविध नावीन्यपूर्ण विषयांवर आपले प्रयोग सादर केले. यामध्ये एलपीजी गॅस डिटेक्टर, कचरा व्यवस्थापन, हायड्रो जनरेटर, हायड्रोलीक मिसाईल लॉन्चर, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या विषयावर अनेक प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा, त्यांच्यातील संशोधकाला चालना मिळावी यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येते. यंदा ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन उमरखेड शहरातील स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल, दहागाव शाळेत करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनीमध्ये उमरखेड तालुक्यातील ७४ शाळांनी सहभाग नोंदवला. प्राथमिक विभागातून प्रथम क्रमांक हुरहून्नीसा उर्दू हायस्कूल उमरखेड, द्वितीय क्रमांक स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मेडीयम स्कुल, दहागाव, गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड ,तर तृतीय क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, उमरखेड तसेच माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, उमरखेड तर द्वितीय क्रमांक संस्कार पोदार लर्न स्कुल, उमरखेड आणि तृतीय क्रमांक हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल ढाणकी असे अनुक्रमे सर्व शाळांनी यश संपादन केले.
प्राथमिक शिक्षक गटामधून शिक्षक प्रतिकृती मध्ये जि. प. मा. शासकीय माध्य. मुलांची शाळा ,उमरखेड आणि माध्यमिक गटामधून संस्कार पोदार लर्न स्कूल उमरखेड तर आदिवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी गटामधून महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगणुर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
दिव्यांग प्राथमिक गटामधून जि. प. मा. शासकीय मुलांची शाळा उमरखेड यांचा प्रथम क्रमांक आला,
प्रदर्शनाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव वड्डे, सचिव नितीन भुतडा, केंद्रप्रमुख अनिल बोपीनवार,केंद्रे, प्रमोद देशमुख, तालुका विज्ञान विभाग अध्यक्ष चंदापुरे, सरितादेवी अग्रवाल, पुनीत अग्रवाल, निधी मित्तल, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे प्रा. कनवाळे, प्रा. देशमुख व प्रा. हरण यांनी या प्रदर्शनी चे परिक्षण केले. संस्था अध्यक्ष दर्शन अग्रवाल, सपना अग्रवाल, संस्थेचे व्यवस्थापक आशिष लासीनकर, शाळेचे मुख्याध्यापक एम.पी.कदम, प्राथ. मुख्याध्यापक विकास डोळस, पल्लवी पराते,पर्यवेक्षक राजकुमार महाजन, गणेश शिरडकर, शाळेचे विज्ञान प्रिय शिक्षक सूरज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
तरुण पिढीला विज्ञान मार्गाकडे नेण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर विद्यार्थी हे नवनवीन गोष्टींचे शोध घेवू शकतात आणि नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये उतरवू शकतात त्यामुळे मुलांना विज्ञानाविषयी आपुलकी व आवड निर्माण होण्यासाठी असे विज्ञान प्रदर्शन होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नितीन भुतडा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.