सामाजिक
परभणी येथील संविधान अवमान प्रकरण ढाणकी ऊमरखेड चर्मकार समाज बांधव तर्फे निषेध नोंदऊन निवेदन दिले…..

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
वानखेडे यांजकडून दिनांक.१७.१२.२०२४.
परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर चौकात संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने अवहेलना केली.आरोपीस कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी तहसीलदार ऊमरखेड तहसील कार्यालय येथे आम्ही अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा ढाणकी ऊमरखेड तालुका समस्त चर्मकार समाज बांधव तर्फे निषेध करतो.सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा मृत्यू झाला त्यांच्या परीवारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.निषेध निवेदन देतेवेळी ऊमरखेड तालुका अध्यक्ष गजानन नारायण वानखेडे,ढाणकी शहराध्यक्ष यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन मारोती सुरोशे ,चेतन गजानन ईसाळकर,लहु कोरडे उपस्थित होते.