सामाजिक

उमरखेडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रकार रात्री लावलेले बॅनर सकाळी गायब उमरखेडमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेचा बॅनरच्या माध्यमातून रोष


शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील उमरखेड ते हरदडा या रस्त्याचे रखडलेले काम व खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसह विरोधी पक्ष व संबंधित बांधकाम विभागाला जाग यावी यासाठी धानोरा (सा.) येथील एका जागरूक नागरिकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावून रोष व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून रस्ते विकासाबाबत कोट्यवधींचा निधी जाहीर करून घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ढाणकी मार्गावरील हरदडा या रस्त्याचे काम गत एक वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तालुक्यातील रात्रंदिवस अत्यंत वर्दळीचा असलेल्या रस्त्याने दुचाकी, चार चाकी, ऊसाचे ट्रॅक्टर, रेती मुरूमांची वाहतूक करणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर चालतात. रस्त्याने दुचाकी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहनधारक वैतागले आहेत. अशातच धानोरा (साचलदेव) येथील आदित्य काळे नामक युवकाने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावून स्थानिक लोकप्रतिनिधींसह विरोधी पक्षांचे कर्तव्य व संबंधित बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. आमचा कोणी वाली आहे का ? या ठळक मथळ्याखाली ‘तुमच्या सर्व नेत्यांची जरा धावपळ कमी झाली असेल तर थोडे विडुळ, हरवडा व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चुरमुरा फाटा या रस्त्याकडे बघा…’ अशा आशयाचे बॅनर लावले.
चौकट
सदर बॅनरमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या
कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्याने बॅनरबाबत चर्चा होत असल्याची कुणकुण संबंधितांना लागली. अशातच रात्री लावलेले बॅनर नगरपालिकेची परवानगी नसल्याचे कारण
पुढे करून मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या
कर्मचाऱ्यांनी सकाळी काढून टाकल्याचा निर्वाळा नगरपालिकेने
दिला. यानंतरही ‘तो’ फोन गेल्यामुळेच नगर पालिकेने सवर बँनर काढून टाकल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!